खेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

खेड : खेड मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची खळबळ उडवून देणारी तक्रार दाखल झाली आहे.

पिडित मुलीच्या आईने पती विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत घडलेली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील एका गावात सख्ख्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला आहे.

हा बलात्काराचा प्रकार पिडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने थेट पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी भादवि कलम ३७६ (२फ) व बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ६, ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रार दाखल झाल्यापासून नराधम बाप घरातून बेपत्ता झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.