रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर (DPC) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड केली असून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या समितीवर विधानमंडळ व संसद सदस्यांमधून आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत या २ जणांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे.

या नव्या निवडीमध्ये दापोलीमधून केदार भिकाजी साठे आणि सचिन मनरंजन जाधव यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून संधी मिळाली आहे. त्यांच्यासह संतोष लक्ष्मण जैतापकर (नरवण, ता. गुहागर), प्रसाद प्रभाकर सावंत (मारळ, ता. संगमेश्वर), विलास (बंधू) रामचंद्र वारिसे (गोळप, ता. जि. रत्नागिरी), संदेश (बापू) मनोहर शेट्ये (साखरपा, ता. संगमेश्वर), अमित गजानन केतकर (कोंडगांव, साखरपा, ता. संगमेश्वर), अजय शांताराम बिरवटकर (पोयनार अलाटीवाडी, ता. खेड) आणि सचिन श्रीकांत वहाळकर (जि. रत्नागिरी) या ९ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ राज्य शासनाकडून सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाच्या पदावधीपर्यंत अबाधित राहणार आहे.

