दापोली : येथील दशानेमा गुजर युवक संस्थेच्या वतीने दिवंगत डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला “द्वितीय आरोग्यवर्धिनी” हा समाजोपयोगी उपक्रम श्री राधाकृष्ण मंदिर येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत भव्य महारक्तदान शिबिर व मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात एकूण १४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ५६ नागरिकांनी मोफत दंतचिकित्सा सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर, ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर बुटाला, सचिन किसन मेहता व राहुल साबळे यांच्या हस्ते कै. डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.

या उद्घाटन समारंभास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, पंचायत समिती सभापती उन्मेश राजे, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, भाऊ इदाते, नरेश घरटकर व समीर शेठ, तसेच नगरसेविका प्रिती शिर्के, डॉ. दिलीप जोशी, डॉ. अनिरुद्ध फडके, डॉ. विद्या दिवाण, डॉ. समिक्षा मेहता, श्रीराम माजलेकर, अरुण गांधी, प्रमोद तलाठी, संदीप दिवेकर, एम. आर. शेट्ये, डॉ. सुभाष चव्हाण, आशिष मेहता, महेश पटोलिया, समीर गांधी, मिलिंद शेठ, प्रदीप शेठ, समीर तलाठी, शिरीष मेहता, डॉ. वरुण मोदी, चंद्रशेखर शेठ, भूपेंद्र तलाठी, स्नेहल बुटाला, विशाखा साबळे, आणि स्नेहल तलाठी आदी उपस्थित होते.
या महारक्तदान शिबिरासाठी सायन ब्लड बँक, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांनी वायकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
मोफत दंतचिकित्सा शिबिरासाठी डॉ. वरुण मोदी व योगिता डेंटल कॉलेजचे विशेष सहकार्य लाभले. याबद्दल डॉ. वरुण मोदी व त्यांच्या सहकारी टीमप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच दशनेमा गुर्जर मंडळ दापोली यांनी राधाकृष्ण मंदिर हॉल या कार्यक्रमासाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, सचिव मयुरेश शेठ, कार्याध्यक्ष व प्रकल्प संचालक ऋषिकेश तलाठी, खजिनदार स्वप्निल मेहता यांनी पुढाकार घेतला.
तसेच सिद्धेश शेठ, परेश बुटाला, साहिल कडके, ऋषिकेश शेठ, तेजस मेहता, अभिजीत तलाठी, संदेश मेहता, स्वामी बुटाला, सार्थक बुटाला, अमित मेहता, पार्थ तलाठी व सुरज मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.
भविष्यातही असे लोकहितकारी व आरोग्यवर्धक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

