सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा (CBSE) निकाल १०० टक्के

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) जाहीर केलेल्या या निकालात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

या परीक्षेत दिव्यांशी नरेंद्र परदेशी हिने ९५.४% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. सृष्टी सदाशिव कुंभार ९२% गुणांसह द्वितीय, तर श्लोक सुदर्शन रांगळे ९१.८% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सीबीएसई बोर्डाचा कडक शिस्तीचा अभ्यासक्रम आणि बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा, तज्ज्ञ शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली तयारी यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि संकल्पना स्पष्ट करण्यावर शाळेने दिलेला भर या निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

या यशाबद्दल शाळेचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि पालकांनी शाळेवर दाखवलेला विश्वास यामुळेच सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई बोर्डाच्या निकालात आपली छाप कायम ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशानंतर यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*