सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल

दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत इंद्र शांताराम शिंदे याने ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ नारायण कोकाटे याने ९४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर समृद्धी संजय गुजर हिने ९४.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

परीक्षेसाठी २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, आणि सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवले, तर १७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुजय मेहता, सेक्रेटरी सुयोग मेहता, खजिनदार संकेत मेहता, सरोज मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्कृष्टतेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*