महामामंडळावर सहदेव बेटकर यांची नियुक्ती होण्याचे संकेत

संगमेश्वर : तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते,माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची दिवाळीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रमधील एका महामंडळाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सहदेव बेटकर यांनी प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी जिह्यात संपर्क दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे. गुहागर विधानसभा मतदार संघातही पक्ष बांधणीचं काम हाती घेतलं आहे.

गेल्या निवडणुकीत भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र सहदेव बेटकर पुन्हा एकदा गुहागर विधानसभा मतदार संघात कामाला लागले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या कुणबी समाजाला न्याय मिळण्यादृष्टीनं सहदेव बेतकर यांना महामंडळाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

शामराव पेजे महामंडळ तर नाही ना? अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. महामंडळाची घोषणा कधी होईल याचीच उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.