
रत्नागिरी : जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 839 असून 8 जण बरे झाल्याने त्यांंना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांची संख्या आता 542 झाली आहे. दरम्यान एका 42 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताची संख्या आता 29 झाली आहे.
कोरोना सोबत श्वसन प्रक्रिया बंद होवून मरण पावलेला हा रुग्ण कुर्धे, पावस येथील होता. सदर रुग्ण 26 जून 2020 रोजी मुंबईहून आला होता. त्याला 4 जुलै 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेपासून तो व्हेंटीलेटरवर होता.
BIG NEWS – परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे,
एकूण पॉझिटिव्ह – 839
बरे झालेले – 542
मृत्यू – 29
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 268
(पैकी 09 रुग्ण होम आयसोलेशन,
3 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले.)
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोली मध्ये 08 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 05, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 01 आणि राजापूर तालुक्यात 05 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 53, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 01, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 13, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 03, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 06, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 03, केकेव्ही, दापोली – 05 असे एकूण 84 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
https://mykokan.in

Leave a Reply