महिलेच्या मृत्यूची चौकशी करा

चिपळूण : तालुक्यातील पेढे सवतसडा येथील धबधब्यावरवपरशुराम पायरवाडी येथील सौ. चैतन्या चंद्रकांत मेटकर यांचा विचित्र अवस्थेत आढळून आला होता.

या घटनेला काही दिवस होऊन देखील पोलीस खात्यामार्फत कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने शनिवारी परशुराम येथील ग्रामस्थांनी चिपळूण प्रांताधिकारी कार्यालय व चिपळूण पोलीस स्थानकात जाऊन चैतन्या चंद्रकांत मेटकर यांच्या संशयास्पर मृत्यूबाबत सखोल तपास व्हावा, अशा मागणीचे म्हणून निवेदन दिले.

यावेळी पंचायत समिती माजी गटनेते अभय सहस्रबुद्धे, परशुराम सरपंच गायत्री जोगले, परशुराम उपसरपंच प्रणित गुरव, ग्रामपंचायत सदस्य जयदीप जोशी, ग्रा. पं. सदस्य सुरेश बहुतले, सदस्य विजया तळेकर, सदस्य स्नेहा किंजळे, सदस्य अनुष्का खळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहिनी खळे, माजी सरपंच रश्मी जोशी, माजी सरपंच रमेश खळे, माजी उपसरपंच प्रदीप लांबे, माजी उपसरपंच मोहन मेटकर, परशुराम तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश कदम, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश काजवे, उद्योजक विश्वास जोशी, माजी ग्रा. पं. सदस्य नामदेव वांद्रे, चंद्रकांत तळेकर, प्रज्ञा पेठे, जयश्री जोशी, वैशाली जोशी, वर्षा खरे, तेजश्री जोशी, संदीप थत्ते, आशिष झगडे, मनोज गणपुले, संजय तळेकर, गणेश जोगले, अनिल पवार आदी होते.