बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

४० वर्षावरील वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जाण्याची शक्यता?

४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे

४० वर्षावरील वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जाण्याची शक्यता?

दिल्ली:- ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आलीआहे. अशा बूस्टर डोससंदर्भातील शिफारस इन्साकॉगने केंद्र सरकारला केली आहे.

ज्यांनी आजवर लस घेतलेली नाही, त्यांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका आहे याची जाणीवही इन्साकॉगने करून दिली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या लसींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज या नव्या
विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शक्यता आहे. मात्र नव्या विषाणूमुळे होणाऱ्या
संसर्गाची तीव्रता मात्र पूर्वीच्या विषाणूंच्या तुलनेत कमी असू शकेल.

ओमायक्रॉनमुळे सर्वाधिक धोका ४० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या लोकांना असल्याने त्यांना बूस्टर डोस देण्यात यावेत, असे इन्साकॉगचे मत आहे. या नव्या विषाणूचे अस्तित्व लवकर शोधून काढण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे शक्य होईल.

जोखमीच्या देशांतून आलेल्यांपैकी १८ जण बाधित : कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची जोखीम असलेल्या देशांमधून भारतात आजवर आलेल्या १६ हजार प्रवाशांपैकी १८ जण कोरोनाबाधित आहेत.

या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. ते म्हणाले, ओमायक्रॉनचा विषाणू शोधण्यासाठी या प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावरून विरोधकांनी सुरु केलेले राजकारण आता थांबवावे, असेही आवाहन मांडवीय यांनी केले.

Possibility of giving booster dose to citizens above 40 years of age?

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *