Powered by : योगेशदादा कदम, आमदार – दापोली

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युट्युब चॅनेल ‘माय कोकण’तर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी ऑनलाईन स्वरचित काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

स्पर्धकांनी आपली कविता १० ऑगस्ट २०२०पर्यंत ‘माय कोकण’च्या weeklymykokan@gmail.com या ई-मेलवर पाठवायची आहे.

कोकण विभागातील कवींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि कोरोनाच्या विचारातून थोडी मुक्ती मिळावी या हेतूनं स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे .

स्पर्धतील गट पुढील प्रमाणे –
१ ) शालेय गट
२ ) महाविद्यालयीन गट
३ ) खुला गट

वरील तिन्ही गटांसाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक – ५०१ व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक – ३०१ व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक – २०१ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी स्पर्धकांनी आपली एकच स्वरचित कविता पाठविण्याचं आवाहन ‘माय कोकण’च्या वतीने करण्यात आलं आहे.

कविता पाठवण्याचा ई-मेल : weeklymykokan@gmail.com

स्पर्धचे नियम
१) स्पर्धकांनी एकच स्वरचित कविता निवडावी आणि ती टाईप करून पाठवावी
२) आपलं संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा
३ ) १० ऑगस्ट नंतर येणाऱ्या कवितांचा विचार केला जाणार नाही
४ ) कवितेमध्ये इमोजींचा वापर करू नये
५ ) विजेत्या स्पर्धकांच्या कविता माय कोकण चॅनेलवर प्रसारीत केल्या जातील.
६) स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्टला जाहीर केला जाणार.
७) सध्याची परिस्थिती पाहता स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राहतील .
८ ) स्पर्धा कालावधीत इतर कोणतेही मेसेज पाठवू नये
९) परीक्षकांचा निकाल निर्णय अंतिम राहील
१० ) परिक्षकांचा परिचय निकाल जाहीर होईल तेव्हा सांगितलं जाईल .
११ ) सर्व विजेत्याना रोख रक्कम व प्रमाणपत्र ऑनलाईन देऊन गौरविले जाईल.

स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा – 9422382853