हर्णै : येथील नजिफ आसिफ भाटकर यांनी बीएचएमएस (BHMS) अंतिम वर्षाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नजिफ यांनी मिळवलेल्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, जिद्द, सातत्य आणि अभ्यासातील चिकाटी असून हर्णै परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल नॅशनल हायस्कूल हर्णैच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने नजिफ भाटकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
नजिफ यांनी भविष्यात उत्तम वैद्यकीय सेवा बजावून समाजाच्या आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्वांकडून भरघोस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

