बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दाभोळ संतापजनक घटना: १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ४० वर्षीय नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दाभोळ संतापजनक घटना: १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ४० वर्षीय नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील दाभोळ परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला पाच महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी ४० वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश कृष्णा फणसकर (रा. ढोरसई, दाभोळ) असे या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी राकेश याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गेल्या वर्षभरापासून तिला जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

नुकतेच पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता, ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले.

यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपासासाठी सर्व कागदपत्रे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली.

दाभोळ सागरी पोलिसांनी आरोपी राकेश फणसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४(१), ६४(२)(M) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी स्वतः तपास हाती घेतला असून, या घटनेची माहिती दापोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाला देण्यात आली आहे. या अमानुष घटनेमुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

BNS 2023, Dabhol Police Station, Dapoli Crime News, dapoli news, Maharashtra Crime, minor girl assault, POCSO Act

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *