दापोली : 31 डिसेंबर रोजी झालेल्या सभेमध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी ची 2023 – 2028ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद मनोहर चितळे यांची निवड करण्यात करण्यात आली आहे. सिनिअर उपाध्यक्ष श्रीराम गणपत माजलेकर, तर ज्युनिअर उपाध्यक्षपदी सचिन मोहन गुजर यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त म्हणून समीर वसंत गांधी आणि आनंद मधुकर करमरकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संस्थेचे सचिव म्हणून सौरभ रामचंद्र बोडस तर सहसचिव म्हणून निलेश जयवंत जालगावकर काम पाहणार आहेत.

दापोली एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. प्रसाद अवधूत करमरकर, दिनेश जयानंद नायक, रविंद्र राजाराम कालेकर, ॲड. विजयसिंह चंद्रकांत पवार, श्रीकांत शिवाजी निजामपूरकर, नितीन नारायण शिंदे, मोहन रघुनाथ शिगवण, अशोक तुळशीराम जाधव, मिहीर दीपक महाजन, उदय माधव वैद्य, श्रेयस श्रीकांत काकिर्डे, स्मिता रमेश सुर्वे आणि आर्या ऋषिकेश भागवत यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व नुतन सदस्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.