
रत्नागिर : शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मारुती बिर्जे याने विजेतेपद पटकावले.
नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत मारुती बिर्जे याने स्वप्नील घडशी याचा पराभव करत मानाची चांदीची गदा आणि रत्नसिंधू केसरी किताब आपल्या नावावर केला.

मांडवीच्या वाळूत रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १०० हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.
यामध्ये पुरुष, महिला आणि मुलांच्या स्वतंत्र गटात ६० हून अधिक कुस्तीचे सामने झाले.
सुमारे ५ तास चाललेल्या या थरारक कुस्ती दंगलीचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हभरातून कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
विजेत्या मारुती बिर्जेला प्रशांत यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि मानपट्टा देऊन गौरविण्यात आले.
याप्रप्रसंगी व्यासपीठावर शाश्वत मानकर, ओंकार फडके, स्वानंद रानडे, अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, बाबा नाचणकर, समीर टाकळे, विनोद भुरण, शशिकांत मोदी, दादा ढेकणे, शुभम पिसे, संदीप भिसे, राहुल पवार, भाई जठार, ऐश्वर्या जठार, महेंद्र मांडवकर, अमित विलणकर, नितीन जाधव, दीपा देवळेकर, ऋषिकेश केळकर, नित्यानंद दळवी, शैलेश बेर्डे, निलेश आखाडे, भक्ती दळी, मुक्ता बाष्टे, सायली बेर्डे, धनश्री पाटील, शोभा जिरोळे, प्रज्ञा टाकळे, प्रसाद बाष्टे, भाई विलणकर, चंद्रशेखर केळकर, सदानंद जोशी आणि विवेक पाटील उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी योगेश मगदूम, शोएब खान, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, कृष्णा पाटील, ययाती शिवलकर, अमृत गोरे, विशाल कांबळे, निखिल शेट्ये, राजेश झगडे, इबद खान, प्रणव सुर्वे, नरेश बनसोडे, सोमनाथ पिलणकर, अभिलाष पिलणकर, अभिलाष कारेकर, राहुल भाटकर, अक्षय शिवलकर, राजू भिसे, ओंकार आंबरे, अमर शेठ, उद्देश लाड, रामदास शेलटकर, प्रणाली तोडणकर आणि सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ तसेच निलेश राणे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply