दापोलीत इको गाडीतून अवैध मद्यवाहतूक; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात विनापरवाना मद्यवाहतूक करणाऱ्या मारुती इको गाडीवर कारवाई केली.

वाहतूक कोंडी सोडवत असताना पोलिसांना संशयास्पद वाटलेली इको गाडी (MH 08 R 8636) अडवण्यात आली. तपासणी केली असता गाडीत देशी दारू आणि बिअरचे विविध बॉक्स आढळून आले.

वाहन चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत २६,८८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, ३२,१० रुपयांच्या विविध ब्रँडच्या बिअर (टुबोर्ग, किंगफिशर, लंडन प्लीसनर) आणि १.५० लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण २,३०,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लांबेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*