1 मे 2024 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपंचयतीच्या प्रभागातील सफाई करणा-या सफाई कामगारांना व घंटा गाडी वरील सफाई कामगार अशा एकूण 38 सफाई कामगारांना गमबूट, झाडू, मास्क व हॅन्ड ग्लोज इत्यादी स्वच्छता विषयक आवश्यक साहित्याचे वाटप रोटरी क्लब दापोली चे अध्यक्ष अजयजी कानडे, तसेच सदस्य संदिप खोचरे, समीर तलाठी, लीना खोचरे, प्रदिप साळवी, तुकाराम खोत, अरुण नरवणकर, जयवंत शिंदे यांचे मार्फत नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले.

प्रथम रोटरी क्लब दापोलीचे अध्यक्ष अजयजी कानडे यांनी प्रास्ताविक करुन रोटरी क्लब या संस्थेची ओळख व झालेले उपक्रम यांची माहिती सर्वांना दिली. तसेच सफाई कर्मचारी यांचे आरोग्यसाठी गमबूट, झाडू, मास्क व हॅन्ड ग्लोज या स्वच्छता विषयक साहित्य महत्व विषद केले. तसेच सदर साहित्य न वापरल्यामुळे सफाई कर्मचारी यांचे आरोग्यावर होणा-या विपरीत परिणामांची सफाई कर्मचारी यांना जाणीव करुन दिली. तसेच सफाई कर्मचारी यांची शहराच्या स्वच्छतेमध्ये असणारी महत्त्वपूर्ण भूमिका व शहराला त्यांची असलेली आवश्यकता याबाबत माहिती दिली.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी रोटरी क्लब दापोलीचे अध्यक्ष अजयजी कानडे यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील महाकाळ यांनी केली. तसेच दापोली नगरपंचायतीचे परिक्षाविधिन मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी रोटरी क्लब दापोली यांचे आभार मानले.

सदर साहित्य वाटप कार्यक्रमाकरीता नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे व पदाधिकारी तसेच परिक्षाविधिन मुख्याधिकारी संकेत गायकवाड रोटरी क्लब दापोली चे अध्यक्ष अजयजी कानडे आणि रोटरी क्लब दापोली चे सदस्य संदिप खोचरे, समीर तलाठी, लीना खोचरे, प्रदिप साळवी, तुकाराम खोत, अरुण नरवणकर, जयवंत शिंदे इत्यादी सदस्य उपस्थित होते. तसेच नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी जयश्री चौरपगार, नगरपंचायतीचे अभियंता सुनिल सावके, विभाग प्रमुख स्वप्नील महाकाळ, अरुण मोहिते, शितल शेठ, मंगेश जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता विषयक आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे सफाई कामगार यांनी रोटरी क्लब दापोलीचे विशेष आभार व्यक्त केले.