रत्नागिरी : कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. कोकणामध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटकांची संख्या सध्या रोडावली आहे.
कोकण किनारपट्टी वरील छोटे-छोटे व्यवसाय यामुळे अडचणीत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मागची संकटं काही दूर होत नाहीयेत.
फयान, निसर्ग, तोक्ते सारखी चक्रीवादळं अलीकडच्या काळात कोकणात धडकू लागली आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायांमध्ये असलेल्या लोकांना बसत आहे.
यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस येतील. दोन पैसे हातात उरतील, अशी आशा इथल्या व्यवसायिकांना होती. पण अवकाळी पावसामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.