दापोली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील खोंडा पांगतवाडी परीसर येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे त्यामुुळे खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर महिला एक चहा विक्रेत्याची पत्नी आहे.

आज सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये एकूण 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह ची संख्या आता 1210 इतकी झाली आहे.

पॉझिटिव्ह अहवालांचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 7
कामथे 18
दापोली 2
कळंबणी 4
गुहागर 3
घरडा 12

हे सर्व अहवाल सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानंतर प्राप्त झालेले आहेत.

-माय कोकण

https://mykokan.in