शिरगाव : भारत सरकार मान्यताप्राप्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत निसार महमद शेख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या यशाद्वारे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात गौरवाचे स्थान प्राप्त करून चिपळूण तालुक्यासह शिरगाव गावाचे नाव उंचावले आहे. मे २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत यश मिळवून त्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती सिद्ध केली आहे.

याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकादमीच्या वतीने त्यांना वृत्तपत्र विद्या पदविका प्रदान करण्यात आली. गेली २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले निसार शेख हे दैनिक सागर व नवराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. संस्थेच्या अध्यक्षा कृत्तिका संदीप मराठे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून भविष्यात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.