द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचा पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलफे, पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना जाहीर

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार वितरण

रत्नागिरी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार पत्रकार सिध्देश मराठे आणि पत्रकार भुषण पुरस्कार माय कोकणचे प्रतिनिधी जमीर खलफे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे होणार आहे.

तसेच पत्रकार दिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी सांगितले.

द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव केला जातो.

यंदाचा पत्रकार भुषण पुरस्कार जमीर खलफे यांना जाहीर झाला आहे. सडेतोड पत्रकारितेबरोबरच जमीर खलफे यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. संपर्क युनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक चळवळ राबवतात. अनेक गोरगरीब रुग्णांसाठी जमीर खलपे आरोग्यदुत म्हणून काम करतात.

यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार सिद्धेश मराठे यांना जाहीर झाला आहे. आक्रमक पत्रकारितेतून अल्पावधीत रत्नागिरीच्या पत्रकारिता क्षेत्रात सिध्देश मराठे यांनी ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्यपद भुषवताना ग्रामीण भागात सामाजिक आणि विकासात्मक कामे केली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*