मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

संस्कृत उपकेंद्रात मोफत योग शिबिराचे आयोजन

संस्कृत उपकेंद्रात मोफत योग शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे निःशुल्क योग शिबिर १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे.

सायंकाळी ५.३० वाजता हे शिबिर प्रतिदिन होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो.

त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी यांनी जराही वेळ न दवडता आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हा l, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा शिवाय https://forms.gle/nCpZjrE31zHnYHtMA या लिंकवरून आपला गुगल फॉर्म भरावा.

free yoga camp, ratnagiri, sankrit university sub centre

Updated: 4 Feb 2025 3:34 AM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *