दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित आणि रामराजे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाखालील आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात कुणाल मंडलिक, आफरीन घनसार, तसेच अतिथी सविता मोरे आणि नीलम बुटाला यांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना योगसाधनेसाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग प्रशिक्षकांचे शाल, श्रीफळ आणि रोप देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमात नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवत विविध आसनांची प्रात्यक्षिके पूर्ण केली.
सविता मोरे आणि नीलम बुटाला यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, पद्मासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन यांसारखी विविध आसने, तसेच अनुलोम-विलोम, भ्रामरी, सूर्यनमस्कार आणि शरीराला पोषक असणारे व्यायामाचे प्रकार करून दाखवले.
याव्यतिरिक्त संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योगाभ्यासाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयांवर प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरभी बेलोसे यांनी केले, तर कृष्णाली बांद्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे धनंजय यादव, दशरथ भोसले, मीना रेडिज, कासम महालदार, नजीर अरकटे, अनंत सणस, सुनिता बेलोसे, जानकी बेलोसे, विलास शिगवण, प्रियदर्शन बेलोसे, दीपक हर्डीकर, सुनील चव्हाण, संदीप राजपुरे, स्मिताली राजपुरे, अशोक निर्बाण, चेतन जैन, दिनेश जैन, नेहा जैन, रुचिता नलावडे, रेखा जेगरकल आणि मृदुला निंबकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने कौतुक केले असून या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

