स्नेहदीप दापोली संचलित इं. वा. बडे कर्णबधिर विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन १२ जुलै २०२२ रोजी खुप ऊत्साहात साजरा करणेत आला.
दीप प्रज्वलन करुन, व सालाबाद प्रमाणे वर्धापनदिनास सुनिता जैन, मुकेश जैन यांजतर्फे आणला जाणारा केक शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते कापुन वर्धापनदिनाची सुरुवात करणेत आली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व गणवेशाचे वाटप करणेत आले.
वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांस्क्रुतिक कार्यक्रम करुन आलेल्या पाहुण्यांची मने जिंकले. त्याचप्रमाणे संस्थेच्या शाळेचे कर्मचारी संतोष जालगांवकर यांचा उत्क्रुष्ठ कर्मचारी म्हणुन त्यांना सन्मानित करणेत आले. पाहुण्यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे खुप कौतुक केले, व विद्यार्थ्यांचे पण खुप कौतुक केले. बलाढ्ये सरांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा व संस्थेबद्दलची संपुर्ण माहिती पाहुण्यांना दिली.
या कार्यक्रमासाठी दापोली पंचायत समितीचे अण्णासाहेब विलास बळवंतराव गटशिक्षणाधिकारी साहेब, तसेच त्यांचे सहकारी गावीत सर केंद्रप्रमुख, धनगुडे सर तालुका समन्वयक, संस्थेच्या अध्यक्षा अधिकारी मॅडम, उपाध्यक्षा सुर्वे मॅडम, सचिव दिनेश जैन, खजिनदार मनोहर जैन, संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका शुभांगी गांधी मॅडम, रेखा बागुल मॅडम, मंगलताई सणस, डॅा.नेहा मेहता, नंदकिशोर भागवत, त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक संचालक यांचे कुटुंबिय श्रीमती बाळ व सुशांत सुहास बाळ, संस्थेचे हितचिंतक सुनिता जैन व मुकेश जैन, शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मादुस्कर मॅडम, संस्थेच्या कनिष्ठ लिपिक मानसी केळकर, वै. सा. कार्यकर्ता संजय बलाढ्ये सर, विशेष शिक्षक संपदा बडबेबाई, श्रध्दा गोरिवले बाई, बंडू कौटेसर व कलाशिक्षक सूर्यकांत खेडेकरसर व धोंडीबा राठोड सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग उपस्थित होते.