दापोली: शहरातील शर्वरी सदन, मेहता हॉस्पिटल येथे डॉ. समीक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांच्या ‘निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन सोमवार, दिनांक 31 मार्च 2025 रोजी गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना. योगेश रामदास कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या सोहळ्याला शिवसेना उपनेते व दापोली विधानसभा माजी आमदार संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले,

खेड, मंडणगड आणि दापोलीकरांच्या सेवेसाठी मेहता कुटुंब नेहमीच तत्पर असते. कोरोना काळातही डॉ. कुणाल मेहता आणि डॉ. समीक्षा मेहता यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणेला अहोरात्र मदत केली होती. हे सोनोग्राफी सेंटर दापोलीकरांसाठी मोठे योगदान आहे. येथे 2D, 3D, 4D आणि 5D अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे रुग्णांचे निदान अचूक होऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होईल. हे केंद्र आरोग्य सेवेत मोलाची भर घालणार आहे.

राज्य मंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात वैयक्तिक अनुभव सांगितला. ते म्हणाले,

माझी मुलगी रुद्राई लहान असताना आम्ही 3D स्कॅन केले, पण त्यात काही आढळले नाही. मात्र, 5D स्कॅनमुळे काही गोष्टी समोर आल्या आणि आम्ही तात्काळ उपचार सुरू केले. आधुनिक वैद्यकीय सुविधांचे महत्त्व मी यानिमित्ताने अधोरेखित केले. दापोलीकरांसाठी ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी डॉ. समीक्षा यांचे आभार मानतो आणि त्यांना नव्या वाटचालीस शुभेच्छा देतो. ‘आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन त्यांचे अभिनंदन करतो.

या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ आण्णा कदम, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेश राजे, ॲड. सुधीर बुटाला, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, माजी जि.प. सभापती चारूता कामतेकर, सुनिल दळवी, निलेश शेठ, दर्शन महाजन, प्रकाश कालेकर, ममता शिंदे, दापोली शहर प्रमुख प्रसाद रेळेकर, दापोली नगरपंचायत नगरसेवक खालीद रखांगे यांच्यासह सर्व आजी-माजी शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि रुग्णवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. समीक्षा मेहता यांनी उपलब्ध करून दिलेल्या या आधुनिक सुविधांमुळे दापोलीतील आरोग्य सेवेत एक नवे पर्व सुरू झाले असून, स्थानिक नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

माय कोकण चॅनेलचे संपादक मुश्ताक खान यांनीही डॉ. कुणाल मेहता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या