आ. राजन साळवी ह्यांना अपात्रतेची नोटीस

रत्नागिरी : मूळ शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांनकडून पक्षांतराच्या कारणावरून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज केला असून त्यानुषंगाने प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचेकडून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांना बचावार्थ लेखी म्हणणे सदर करणेसाठी अपात्रतेबाबतची नोटीस देण्यात आली आहे.

अनपेक्षितपणे शिवसेनेमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे संघर्षमय वातारवण निर्माण झाले असून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले असल्यामुळे आमदार राजन साळवी यांची आमदारकी सुध्दा अपात्र करण्याचा प्रयत्न शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांकडून केला जात आहे.

या नोटीशीला आमदार राजन साळवी यांनी उत्तर दिले असून शिवसेनेने माझ्यावर विश्वास ठेवत आजपर्यंत  मला नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, आमदार अशी मानाची पदे दिली आहेत. त्यामुळे माझ्याकडील आमदारकी अपात्र ठरवल्यास मी माझी आमदारकीही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करेन, असे सांगितले.