आशुतोष कुलकर्णी यांची प्रथम क्रमांकची सही

खेड : २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रमामध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर राजेंद्र लिंगायत यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. खेड शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक येथे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.

राजेंद्र लिंगायत बक्षीस स्वीकारताना

मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी अस्मिता जोपासली जावी याकरीता हा उपक्रम गेले १४ हुन अधिक वर्षे खेड शहर तसेच महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केला जातो.

यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष वैभव खेडेकर, वैभवी खेडेकर, ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, शहर उपाध्यक्ष केदार वणजू, सांस्कृतिक सेनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, महिला सेना तालुकाध्यक्ष राजश्री पाटणे, शहर उपाध्यक्षा मिनल गांधी, प्रिती स्वरुप माजलेकर, मिनल शेखर गुहागरकर, लतिका मयुर दांडेकर, दर्शना हेमंत गुडेकर, जयेश गुहागरकर, पंकज पुळेकर आदी उपस्थित होते.

राजेंद्र लिंगायत यांची द्वितीय क्रमांकची सही