रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय प्रमाणक संस्था म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी या महाविद्यालयास मानाचा आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झालं आहे. विद्यार्थ्यांच्या समाधानात वाढ ,आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव नोंदणी करणे, कर्मचा-यामध्ये कार्यसंस्कृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणात संख्या वाढविणे, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि कार्यक्षमता, खर्चात बचत करणे, विद्यार्थ्यांना अधिक व्यवसायाच्या संधी देणे, सेवेचे व्यवस्थापन करणे, समस्येवर उपाय शोधणे, बाह्य पडताळणीचे फायदे जाणून घेणे, आय.एस.ओ.मानांकन संस्थेसाठी फायदेशीर आहेत कारण ते व्यवसाय प्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठी तृतीय पक्ष आणतात आणि त्यांना समान समस्यांचा अनुभव असतो आणि त्यांना कार्यक्षमतेने सामोरे जावे लागते. त्यांच्या अनुभवामुळे संस्थेच्या प्रक्रियेत काय चालले आहे ते पाहण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होतो.


आय.एस.ओ.मानांकन AQC Middle East LLC (AQC) having its Registered office at Office No.2, Ground Floor, Sharjah Media City, Sharjah, UAE या संस्थेकडून करून घेण्यात आले आहे.

आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र

महाविद्यालयातील प्रशिक्षणात गुणवत्ता विकसित होण्याचा दृष्टीने आय.एस.ओ.मानांकन महत्वाचे आहे. दिनांक १६/०२/२०२३ रोजी मुल्यांकन समितीकडून अंतर्गत पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये विविध विभाग, बी.एड. प्रशिक्षण सोयी सुविधा यांची माहिती घेण्यात आली होती. अंतिम पाहणी दि.२७/०२/२०२३ रोजी करण्यात येऊन समितीने आय.एस.ओ.मानांकन महाविद्यालयास पाच वर्षासाठी दिले आहे.

आय.एस.ओ. मानांकन मिळविण्यात या महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ.राजश्री देशपांडे, आय.एस.ओ. विभागाचे समन्वयक डॉ. तारसिंग नाईक व सहसमन्वयक म्हणून डॉ. रामदास लिहितकर यांनी काम पहिले आहे. महाविद्यालयातील डॉ.ज्योत्स्ना ठाकूर, डॉ.काशिनाथ मस्के, डॉ.उज्वला डोणे, डॉ.रमेश भोसले, प्रा.प्रवीण चाकोते, प्रमोद मादगे, प्रज्ञा जाधव, प्रशांत नलावडे,श्री अभिषेक लोकरे श्रीमती अपर्णा लोकरे, रविंद्र माचिवले, राहुल माचिवले यांनी याकामी सहकार्य केले आहे.