रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक तात्कालीन कारणासाठी प्रवास करणे आवश्यक असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन दि. २३/०४/२०२१ रोजी पासुन आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पास सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या सेवेचा उपयोग अत्यावश्यक व तात्कालीक कारणासाठी अंतरजिल्हा प्रवास करण्याच्या नागरिकांना होत होता. परंतु सदर ई पास सुविधेचा काही लोकांनी गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर रत्नागिरी जिल्हामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
दि.३०/०४/२०२१ रोजी कशेडी चेक पोस्ट येथे खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम व अन्य पोलीस अमंलदार हे मुंबई कडुन येणाऱ्या वाहनांची तपासणी असतांना एका झायलो गाडीतील व्यक्तीकडे असलेल्या पास वरील क्युआर कोड स्कॅन केला असता, तो पास बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतली असता, तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत खेड पोलीस ठाणे येथे पो.शि. अविनाश अनंत टेमकर यांचे तक्रारीवरुन गु.र.नं. ११६/२०२१ कलम ४२०, ४६८, ४७१, २६९,३४ भा.दं.वि. प्रमाणे आरोपी (१) महंमद वसीम रुफीक लालु, रा. उद्यमनगर रत्नागिरी (२) तन्वीर खुदबु काझी, रा.कोकणनगर रत्नागिरी, (३) अजीम अब्दुल कादीर मंगा रा. अपराध हॉस्पीटल, गोडबोले स्टॉप जवळ रत्नागिरी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात असे निष्पन्न झाले की, वरील झायलो गाडीचा चालक महमद वसीम रफिक लालु, रा. उद्यमनगर, रत्नागिरी यांना त्यांचा मावसभाऊ तनविर कुदबू काझी, रा. कोकणनगर, रत्नागिरी यांनी अशी माहीती दिली की, अजीम मंगा हा पास तयार करून देतो व त्यानुसार अजीम मंगा याने बनावट पास तयार करून दिला व त्याचा वापर केला गेला. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. वैशाली आडकुर या करीत आहेत. सदरची घटना निदर्शनास आल्या नंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाचे प्रसाराने होणारी जिवितहाणी रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व चेक पोस्टवर बाहेरच्या जिल्हयातुन येणान्या लोकांचे पास अधिक काटेकोरपणे तपासणीच्या सुचना मा.पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिल्या.
या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हयातील सर्व चेक पोस्टवर काटेकारपणे तपासणी सुरु असताना, आज दि.०९/०५/२०२१ रोजी कशेडी चेक पोस्ट येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम हे त्यांचे सहकारी पो.शि. सागर नवाळे, पो. शि. राजाराम पाटील, पो.शि.सुहास लाड, पो.शि. सचिन लगारे यांचे सोबत वाहनांची व ई पासची तपासणी करीत असता मुंबईहुन येणाऱ्या एका पांढन्या रंगाच्या इनोव्हा कार मधील लोकांकडे असणारा पास बनावट असल्याचा संशय आला. तो पास क्युआर कोडने स्कॅन केला असता, तो पास खरा असल्याचे दिसून आले नाही. यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतली असता, तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत पो.शि.सागर निवृत्ती नवाळे यांच्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाणे येथे गु.नो.क्र. १४९/२०२१ कलम ४२०, ४६८, ४७१, २६९,३४ भा.दं.वि. प्रमाणे सदर वाहनाचा चालक प्रशांत प्रकाश पाटील, वय ४३ वर्षे आणि वाहनाचे मालक व प्रवासी अंकित अनंत पडीयार, वय २३ वर्षे, रा. कस्तुरी बिल्डींग, न्यु दिवाण मान, वसई पश्चिम यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, यातील वाहन मालक अंकित पडीयार यांनी पालघर जिल्हयातील एका इसमास मोबाईल फोनवरून कागदपत्रे पाठवून रु.६००/- ला बनावट पास तयार करुन दिला आणि या पासचा उपयोग करून यातील आरोपी हे वसई ते राजापुर तालुक्यातील हारडी येथे जाणार होते. सदर गुन्हयाचा तपास परि पोलीस उपनिरीक्षक सुजीत सोनवणे हे करीत आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन विहित नियमांची रात्रौंदिवस कडक अमंलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हयातील सर्व चेक पोस्टला अधिक सतर्कपणे कर्तव्य बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हयांतर्गतही तसेच मोठ्या शहरांमध्ये नाकाबंदी नेमण्यात आली असुन त्यांच्या कडुन तसेच गस्ती पोलीस पथकाव्दारे नियमांचा भंग करणाऱ्या लोकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण व अवाजवी कारणाशिवाय वाहनांने फिरणाऱ्या लोकांविरुध्द मोटार वाहन कायदा व अन्य कायदयान्वये कारवाई करण्यात येत आहे.
या पार्श्वभुमीवर असे आवाहन करण्यात येते की, ई पाससाठी अर्ज करताना गरजु नागरिकांनी कायदेशिर मार्गाचा अवलंब करावा. कोणत्याही अविश्वासु व्यक्तिची मदत घेऊ नये. वैध ई पास शिवाय प्रवास करु नये. ई पास काढण्यासाठी प्रशासनाकडुन कोणतेही शुल्क आकारले जात नाही.