दापोली– दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब आणि समावेशित शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. आझाद मैदान दापोली येथून सुरु झालेली फेरी दिव्यांग शाळा जालगाव, आझाद मैदान या ६ किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक तसेच काही दिव्यांगही सायकल चालवत सहभागी झाले होते. अनेक दिव्यांग गाडी चालवत सोबत होते.

रवींद्र गायकवाड, सुरेश जोशी, मंगेश महाडिक, दिपक बेनेरे, अथर्व सोमण, श्रावणी सूर्यवंशी, मानसी जुवेकर, पद्मनाभ केळकर यांनी अपंगत्वावर मात करुन यशस्वीपणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यांचे अनुभव ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

दापोलीमधील इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय आणि बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव येथे रेखा बागुल, स्मिता सुर्वे, निलांबरी अधिकारी, माधुरी मादुस्कर, महेश्वरी विचारे, दिनेश जैन, किरण घोरपडे, संजय बलाध्ये, सूर्यकांत खेडेकर, श्री. धोत्रे, कमलेशा मुसलोणकर, शितल देवरुखकर, कर्मचारी यांनी अद्ययावत कार्यशाळा, श्रवण यंत्रणा, दिव्यांग विद्यार्थी, उपक्रम, रोजगार प्रशिक्षण इत्यादींबाबत माहिती सांगितली व शाळा दाखवली.

सायकल फेरीमध्ये दापोली पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक शितल पाटील, श्री. बुरटे, भूषण सावंत, दिलीप नवाळे, साक्षी गुजर, सुहास पाटील इत्यादींनी सायकल फेरीत सहभागी होत सायकल चालवली. समावेशित शिक्षण विभाग पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी कल्याणी मुळे, रेवन्नाथ धनगुडे, बिरुदेव सरगर, वैभव बुरटे, सूरज क्षिरसागर, नितीन चौधरी यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, लाडू, पाणी, सरबत देऊन स्वागत करण्यात आले. सायकल फेरीचे नियोजन करण्यात पराग केळसकर, संदीप भाटकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, रोहन कदम, सुनिल रिसबूड, राकेश झगडे, सुरज शेठ, नरेंद्र बर्वे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.