मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुका कार्यकारिणीची निवड

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुका कार्यकारिणीची निवड

दापोली : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुका कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.

महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखाली राज्य तसेच जिल्हास्तरावरून या निवडी करण्यात आल्या. दापोली तालुका अध्यक्षपदी अमोल मोरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात महासंघाचे संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी उजेर शेख, तर कायदेविषयक सल्लागारपदी प्रमोद गुंजाळ यांची निवड झाली आहे.

तसेच दापोली तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी गोरख वागसकर, सचिवपदी सुरज गायकर, कार्याध्यक्षपदी विकास पटले, कोषाध्यक्षपदी विनेश साळवी, प्रसिद्धी प्रमुखपदी नकुल कड आणि मुख्य संघटकपदी केशव नागरगोजे यांची निवड करण्यात आली आहे.

या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे प्रश्न, प्रशासकीय अडचणी तसेच सेवाविषयक विषय शासनादरबारी प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सध्या अभिनंदन केले जात आहे.

dapoli news, Educational Officers Organization, Executive Committee Election, Kendrapramukh Adhikari Mahasangh, Maharashtra News, ratnagiri district

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *