दापोली : दापोली तालुक्यातील करजगाव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर (वय 67) हे 4 जूनला सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेले असून ते अद्याप घरी परत न आल्याने हरवले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करजगांव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर हे मनोरूग्ण असलेले वृध्द घरातून निघून गेले आहेत. रामा बागकर यांचा रंग गोरा, उंची 5.6 इंच, काळे डोळे, केस पिकलेले, सडपातळ बांधा, सफेद रंगाची बनीयन व चॉकलेटी रंगाची हाफ पँट परिधान केलेली आहे. सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास दापोली पोलिस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन हेडकॉन्स्टेबर अजित गुजर यांनी केले.