दापोली कृषि विद्यापीठाला ‘अ’ दर्जा

दापोली: कोकणातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) कडून मानांकन प्रक्रियेत ‘अ’ (A) ग्रेड प्राप्त करून मोठी झेप घेतली आहे.

हे मानांकन २०२५ ते २०२९ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले असून, यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाली आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने अध्यापन पद्धती, संशोधनाची प्रत, आधुनिक सोयी-सुविधा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे विस्तारकार्य या निकषांच्या आधारे हे मानांकन दिले आहे.

कोकणातील स्थानिक पिकांचा विकास आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

डॉ. संजय भावे, कुलगुरू

कुलगुरु संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.

या मानांकनामुळे भविष्यात संशोधन व शिक्षण क्षेत्रात विद्यापीठासाठी नव्या संधी उपलब्ध होणार असून सर्व स्तरांतून विद्यापीठाचे अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*