नगराध्यक्षा परवीन शेख यांचा पदाचा राजीनामा

दापोली : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा मंगळवारी सुपूर्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. परवीन शेख या मनाने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या होत्या.



आता राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. ती सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे.

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यंदा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये त्या निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. अहमदनगर असं या वॉर्डाचं नाव आहे. ओबीसी महिला असं आरक्षण या वॉर्डामध्ये पडलं आहे.

त्यांच्यासमोर पुन्हा एकदा संचिता जोशी शिवसेनेकडून असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोघी एकमेकांविरोधात लढल्या होत्या. पण त्यावेळेला परवीन शेख या शिवसेनेमध्ये होत्या आणि संचिता जोशी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या.

संचिता जोशी आणि परवीन शेख

या निवडणुकीमध्ये संचिता जोशी या परवीन शेख यांचा पराभव करून गेल्या वेळचा वचपा काढतात की पुन्हा एकदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय हे येत्या 22 डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. पण यंदाची निवडणूक अटीतटीची होईल हे नक्की.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*