मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत भाजपला धक्का; युवा मोर्चा शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

दापोलीत भाजपला धक्का; युवा मोर्चा शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

दापोली : भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्का बसला आहे. भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज दत्तात्रय खोत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली असून नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे.

पक्ष सोडण्यापूर्वी विराज खोत यांनी दापोली भाजपच्या तालुकाध्यक्षांकडे एका पत्राद्वारे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करूनही संघटनात्मक पातळीवर अपेक्षित सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत त्यांनी या पत्रात मांडली.

तसेच, पक्षात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान आणि सहकार्य मिळत नसेल, तर संघटनात्मक ताकद कशी टिकणार, असा सवाल खोत यांच्या राजीनाम्यामुळे उपस्थित झाला आहे.

युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांनीच बंड पुकारल्याने दापोली भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या घटनेमुळे पक्षावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, विराज खोत यांच्या शिवसेना प्रवेशावर स्वरूप महाजन यांनी ही तर फक्त सुरुवात आहे, असा सूचक इशारा दिला आहे.

त्यामुळे आगामी काळात दापोलीच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

bjp, Dapoli Politics, Maharashtra Politics, Political Resignation, Shiv Sena Shinde Faction, Swaroop Mahajan, Viraj Khot

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *