दापोली : येथील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये नुकत्याच महत्त्वपूर्ण प्रशासकीय आणि शैक्षणिक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. जी. बी. साठे यांची निवड करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण जबाबदारीसोबतच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी प्रा. डॉ. गंगा गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या दोन्ही नियुक्त्यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळातून, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नव्या जबाबदारीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाला निश्चितच आणखी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा