दापोली (शमशाद खान) : तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.

तालुका आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं चिंतेचं वातावरण होतं. पण आता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं आरोग्य विभागानं सुटकेचा निश्वास सोडला आहे. उद्यापासून नव्या जोमानं, नव्या जोशानं सर्व खबरदारी घेत मैदानात उतरायचं आरोग्य विभागानं ठरवलं आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी म्हटलं आहे की,

डॉ. शिवा बिरादार, तालुका आरोग्य अधिकारी

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. अनावश्यकरित्या बाहेर पडणं प्रत्येकानं टाळलं पाहिजे. मास्क शिवाय चुकूनही कुणी बाहेर पडू नये. त्याचबरोरब सोशियल डिस्टंसिंगचा विसर पडू देऊ नका. अन्याथा कोरोनाच्या लढाईत आपण मागे पडू. आम्ही तुमच्या सोबत आहोतच पण आता नागरिकांनी आपली काळजी घेणं आवश्यक आहे.

दापोली तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात कोरोनाचे रूग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन पाळला गेला आहे. आता डॉकडाऊन थोडा शिथिल केला गेला आहे. पण नागरिकांनी खरच गरज असेल तर बाहेर पडावं. शासनामार्फत सुट आहे म्हणून उगाच बाहेर पडू नये, असं अवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.

हेही वाचा –प्राथमिक आरोग्य केंद्राची OPD काही दिवस बंद राहणार