दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तालुक्यात आता एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 125 वर पोहोचली आहे. आज दिनांक 15 जुलै २०२० रोजी 7 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सात पैकी 2 रत्नागिरीत हलवण्यात आले आहेत तर ५ जण किसान भवनमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
दापोलीतील 7 रूग्ण कुठले आहेत याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.
4 रूग्ण पाजपंढरी
1 रूग्ण गव्हे
1 रूग्ण दाभोळ
1 रूग्ण श्रीवर्धन
दापोली तालुक्यातील 125 रूग्णांपैकी कोकण कृषी विद्यापीठातील किसान भवन इथं सध्या 32 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 12 रूग्ण रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहेत.
आतापर्यंत दापोलीतील 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचाराअंती दगावले आहेत तर एका रूग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. (my kokan) एक रूग्ण मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहे
बरे झाल्यानंतर 4 रूग्ण खेडमधून घरी पाठवले गेले आहेत. दापोलीतून बरे होऊन घरी गेलेले रूग्ण 59 आहेत तर रत्नागिरीतून बरे होऊन दापोलीतील घरी आलेले रूग्ण 10 आहेत. याचाच अर्थ असा की बरे होणाऱ्या रूग्णांचा आडका दापोलीत 73 इतका आहे. (my kokan)
एकूण पॉझिटिव्ह रूग्ण – 125
दापोलीत उपचार घेत असलेले – 32
एकूण बरे झालेले रूग्ण – 73
रत्नागिरीत दाखल असलेले – 12
मृत झालेले रूण – 6
उपचारापूर्वी मृत झालेली व्यक्ती – 1
मुंबईत उपचारासाठी गेलेली व्यक्ती – 1
वैद्यकीय टीमची कामगिरी सरस
दापोली येथील उपजिल्हा रूग्णालय आणि तालुका आरोग्य विभागाचं कार्य कौतुकास्पद आहे. अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत ते रूग्ण सेवा देत आहेत. आतापर्यंत 73 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यावरूनच त्यांचं सेवाकार्य आपल्या लक्षात येत असेल.
कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावणाऱ्या सर्व कोरोना योद्धांचं कौतुक करायची ही वेळ आहे. अशा काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुणीही निर्माण करणं चुक आहे. या लढाईमध्ये आरोग्य विभागाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे.
108 रूग्णवाहिकेची कमतरता
दापोलीमधून पॉझिटिव्ह रूग्णांना रत्नागिरीत हलवायचं झालं तर खूप अडचणी येत आहेत. सध्या तालुक्याकडे 108 रूग्णवाहिका फक्त एकच आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त रूग्णाची परिस्थिती ढासळली तर रूग्णवाहिका लवकर उपलब्ध होत नाहीये.
त्यामुळे काही रूग्णांना खासगी वाहनातूनही रत्नागिरीत हलवावं लागत आहे. जिल्हा प्रशासनानं ही अडचण तातडीनं सोडवणं आवश्यक आहे. कोरोनाशी लढाई लढताना सर्व यंत्र सामृग्री असणं आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन लवकरच या अडचणी दूर करेल अशी आशा आहे.