दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

ज्यांना पाठदुखी, कंबरदुखी, गुडघादुखीचा त्रास आहे, त्यांना या सेवेचा लाभ होऊ शकतो.

या रोबोटिक मसाज सेवेमध्ये ऑटोमॅटिक चेअर, ऑटोमॅटिक फुल बॉडी मसाज चेअर, ऑटोमॅटिक बेड, कांस्य थाळी फूट मबाज, फूट ऍक्युप्रेशरची सुविधा असणार आहे.

जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन दापोली अर्बन कॉ ऑप बँकेच्या संचालिका रमा बेलोसे, संगिता तालाठी आणि ॲड. वृषाली दांडेकर यांनी केलं आहे.