Virus

रत्नागिरी : शमशाद खान

कोरोना रूग्णांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झपाट्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा चढाच राहिला आहे. रविवारी रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.

कोरोनाची मुकाबला करताना आणखी ३ कोरोना योद्धांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघेही जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत आहेत. यामधील एक अधिसेविका असल्यानं रूग्णालय प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

४० रूग्णांची आकडेवारी खालील प्रमाणे,

उपजिल्हा रूग्णालय, कळंबणी – १५

उपजिल्हा रूग्णालय, कामथे – १४

जिल्हा कोव्हिड रूग्णालय, रत्नागिरी – ८

राजापूर रूग्णालय – २

उपजिल्हा रूग्णालय, दापोली – १

यामध्ये चिपळूणमधील एकाच भागातील रूग्णांमुळे चिपळूण शहराचा आकडा ५०च्या घरात पोहोचला आहे. शहरातील पेठमाप- गोवळकोट रोडवरील एका इमारतीत १३ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. पेठमाप- गोवळकोट या भागातच पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता २८ झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाच्या लाढाईत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.