दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दापोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन मराठी पत्रकार दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगते व्यक्त केली.
सुरुवातीला प्रशांत परांजपे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन बदलत्या पत्रकारितेची विषयी आपले विचार व्यक्त केले .संदेश राऊत यांनी या दिवसाचे महत्त्व कथन करताना सांगितले की आद्यपत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म व पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण याची सुरुवात 6 जानेवारी रोजी झाल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मासिक दिग्दर्शन याची केलेली सुरुवात, 1780 साली बेंगाल गॅझेट नावाने सुरुवात झालेले भारतातील पहिले वृत्तपत्र, शिवाजीचे उच्चार असे स्तंभलेखन केल्यामुळे 18 महीने तुरुंगवास भोगणारे लोकमान्य टिळक, तर शाळीग्राम देवता खटल्याप्रकरणी न्यायाधिशांवर टीकास्त्र सोडणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक पत्रकारिते विषयी यावेळी माहिती दिली.
बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, बाबुराव ठाकूर आदी पत्रकारांनी जपलेला या चौथ्या स्तंभाचा वारसा आपण सर्वांना पुढे न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
संदेश राऊत यांनी या दिवसाचे महत्त्व कथन करताना सांगितले की आद्यपत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म व पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण याची सुरुवात 6 जानेवारी रोजी झाल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मासिक दिग्दर्शन याची केलेली सुरुवात, 1780 साली बेंगाल गॅझेट नावाने सुरुवात झालेले भारतातील पहिले वृत्तपत्र, शिवाजीचे उच्चार असे स्तंभलेखन केल्यामुळे 18 महीने तुरुंगवास भोगणारे लोकमान्य टिळक, तर शाळीग्राम देवता खटल्याप्रकरणी न्यायाधिशांवर टीकास्त्र सोडणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक पत्रकारिते विषयी यावेळी माहिती दिली.
बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, बाबुराव ठाकूर आदी पत्रकारांनी जपलेला या चौथ्या स्तंभाचा वारसा आपण सर्वांना पुढे न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रिंट मीडिया, यूट्यूब चैनल, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचा आढावा घेताना बदलत्या पत्रकारितेची स्वरूप, आव्हाने याचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर शिवाजी गोरे यांनी सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
जगदीश वामकर यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप व्यवसायिक पत्रकारितेकडे झुकणारा कल आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आवश्यक असणारी ताकद यावर आपले विचार व्यक्त केले.
मनोज पवार यांनी पत्रकारितेमध्ये 27 वर्ष कार्य करीत असताना पत्रकारितेमध्ये झालेले बदल, आलेले अनुभव आणि निर्भीड पत्रकारितेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जपताना आलेल्या समस्या यांचा आढावा घेतला.
महिला पत्रकार प्रतिनिधी म्हणून विचार व्यक्त करताना ज्योती बिवलकर यांनी सांगितले की सर्व पत्रकारांनी एकत्रित काम करीत असताना हक्काची जागा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, शिवाजी गोरे, जगदीश वामकर, प्रवीण शिंदे, प्रसाद रानडे, यशवंत कांबळे, अरविंद वानखेडे, संदेश राऊत, महेश महाडिक, जितेंद्र गावडे, प्रतीक तुपे, प्रशांत परांजपे, अजित सुर्वे, रुपेश वाईकर, प्रशांत कांबळे, आनंद करमरकर, अशोक चव्हाण, दिलीप जाधव, सलीम रखांगे, शमशाद खान, ज्योती बिवलकर, कैलास गांधी, सुदेश मालवणकर, विशाल बोरघरे, दीपक सूर्यवंशी, साहिल गुरव, फैसल काझी आदी पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पत्रकार चंद्रशेखर जोशी, मुश्ताक खान, वैभव जोशी, मंगेश शिंदे, राजगोपाल मयेकर, राधेश लिंगायत, आनंद पिल्ले आदी पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या.