दापोली : बहुविकलांग दिव्यांग (गतिमंद) मुलांच्या जीवनात आनंद फुलावा, त्यांना समाजप्रवाहात आणावे या सामाजिक जाणीवेतून दापोली शहराजवळ जालगाव येथे बहुविकलांग दिव्यांग (मतिमंद) मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.

दापोलीतील व्यापारी हसमुख जैन, सौ. शुभांगी वसंत गांधी उर्फ गांधी, रामराजे संदीप राजपुरे, सौ.बागुल, माहेश्वरी विचारे, समीर गांधी, डॉ. करमरकर, श्रीमती शीतल देवरुखकर आदींनी मिळून हे केंद्र सुरू केलंय.

या केंद्राचं उद्घाटन जालगांवचे उपसरपंच विकांस उर्फ बापु लिंगावळे, संस्थेचे संचालक हसमुख जैन, शुभांगी गांधी यांचे हस्ते १५ ऑगस्ट 2021 रोजी रविवारी सकाळी १०:३० वाजता करणेत आले.

याप्रसंगी श्री. भिकुजी उर्फ दादा इदाते यांनी दिल्ली कार्यालयातुन फोनवरुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी दापोली पं.स.सभापती योगिता बांद्रे, उपसभापती मनोजजी भांबीड, जि.प.सदस्य व माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर, माजी सभापती किशोर देसाई, भाऊ इदाते, लायन्स क्लब अध्यक्ष चेतन जैन, जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मंडलिक ,युवासेनेचे ऋषी गुजर, विरु लिंगावळे, विकास व उमेश जाधव, स्नेहदीप संस्थेचे अध्यक्ष अधिकारी, उपाध्यक्षा सुर्वे, खजिनदार मनोहर जैन, संचालिका मंगलताई सणस, नंदकिशोर भागवत, डॉ. नेहा मेहता, ज्ञानदीप संस्थेचे सुजय मेहता, गोपळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया, खेडचे प्रकाश जैन, महेंद्र शेठ, जालगांव ग्रामपंचायत सदस्य विनोद आवळे, मिलिंद शेठ, गोळे काका, प्रशांत परांजपे, आशिष व प्रसाद मेहता, मंदार केळकर, मनोहर व राजेश जैन, मुसळोणकर गुरुजी, राजेंद्र बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल मंडलिक व विचारे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप राजपुरे यांनी केले. पालक सौ. सावंत यांनी दापोली तालुक्याची या शाळेची गरज होती. नॉर्मल मुलांसाठी दापोली तालुक्यात अनेक शाळा आहेत, मुकबधीर मुलांसाठीही आहे, अंधशाळा देखील आहे, परंतु दिव्यांगांसाठी शाळा नव्हती ती संचालक हसमुख जैन, गांधी मॅडम, बागुल मॅडम, विचारे मॅडम, संदिपजी राजपुरे व त्यांचे सहकारी संचालक यांनी सुरु केल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार मानले.

सध्या या केंद्रात १५ विद्याथ्यांनी प्रवेश घेतला असुन सोमवार ते शनिवार जालगांव बाजारपेठ येथे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी व अधिक माहितीसाठी 9422382620 किंवा 99223 35326 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करणेत आले आहे.