खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीक एका कार मधून गांजा वाहतूक करणाऱ्या तिघांना ४ लाख ४१ हजार रुपयांच्या २२ किलो गांजा सह एक कार असा तब्बल १० लाख ४१ हजार ३८० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण व खेड पोलीस यांनी संयुक्त रित्या २६ ऑगस्ट रोजी १० .४५ वा च्या सुमारास केली.
या प्रकरणी उदयसिंह मदनसिंह चुंडावत (वय ३७ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी), विशाल विद्याधर कोकाटे (वय ३४ वर्षे, रा. पोस्ट ऑफीस बिल्डींग, मंडणगड, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी), सिध्देश उदय गुजर (वय ३२ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड ता. मंडणगड जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी आगामी सण व उत्सवाचे अनुषंगाने मालाविषयक गुन्ह्यांना आळा बसणेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गावर पेट्रोलींग करणेबाबत सुचना देवून, अवैध व गैरकायदेशीर आढळुन येणाऱ्या कृत्यांबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत मागदर्शन केलेले होते. त्याप्रमाणे .२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण व खेड उपविभागमध्ये पेट्रोलींग करत असताना नेमलेल्या पथकाने ही कारवाई केली
हे पथक २६ रोजी पेट्रोलींग करीत भरणे नाका येथे आले असता, रात्रौ १०. ४५ वाजता गोवा मुंबई महामार्गावर भरणेनाका येथे रोडचे डावे बाजूस रोडलगत एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन दोन्ही दरवाजे उघडे करून उभे असल्याचे दिसुन आले. म्हणून सदर पथकाने वाहनाजवळ जावुन खात्री केली असता, सदर वाहनामध्ये चालकासह अन्य दोन इसम बसलेले व त्या दोघांच्या मांडीवर बॅगा असल्याचे दिसुन आले. वाहनातील इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी प्रथम असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे हालचालीवरून त्याचा अधिक संशय आल्याने, त्यांची व त्यांचेकडील चारचाकी वाहन व सामानाची झडती घेतली असता, त्यांचेकडील सॅकमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला,
त्यांचेकडुन एकुण ४,४१,१८० रुपये किंमतीचा २२.०५९ कि.ग्रॅम वजनाचा गांजा, दोन सॅक बॅग व ६,लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची चारचाकी कार असा एकुण १०,लाख ४१,हजार ३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपींविरुद्ध खेड पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन, अधिक तपास खेड पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी . पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक स्थागुअशा रत्नागिरी, पो.नि.श्री. नितीन भोयर, पोऊनि येवले खेड पोलीस ठाणे, सपोफौ/ प्रशांत बोरकर, पोहवा/ सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, अतुल कांबळे स्थागुअशा रत्नागिरी, पोशि/ वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे यांनी केली