संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथील पऱ्याजवळ वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
रविवारी दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३२), चेतन सूर्यकांत सागवेकर (१८) दोघेही रा. धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याबरोबर वाहत जाऊन या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली.
या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार ( २७ ), शुभम शांताराम चव्हाण (२०), राज तुकाराम चव्हाण (१८), साईल संतोष कांगणे ( १७ ) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आलं नाही.
बुडालेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. गेल्या वर्षी देखील या ठिकाणी अशीच दुर्दैवी घटना घडली होती.