सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

गुहागर चिखलीत दर मंगळवारी भरणार गुरांचा बाजार; शेतकऱ्यांना भाजीपाला, फळविक्रीचीही संधी

गुहागर चिखलीत दर मंगळवारी भरणार गुरांचा बाजार; शेतकऱ्यांना भाजीपाला, फळविक्रीचीही संधी

गुहागर : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे दर मंगळवारी गुरांचा बाजार भरविण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील पशुपालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीसाठी स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

या साप्ताहिक बाजारामध्ये गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होणार आहे.

त्यामुळे पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आपली जनावरे विकण्यासाठी आणि आवश्यक जनावरे खरेदी करण्यासाठी सोयीचे व्यासपीठ मिळणार आहे.

केवळ पशुधनाच्या खरेदी-विक्रीपुरता हा बाजार मर्यादित न ठेवता, स्थानिक भाजीपाला उत्पादक आणि फळबागायतदार शेतकऱ्यांनाही आपला शेतमाल विकण्यासाठी येथे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दर मंगळवारी भरणाऱ्या या बाजारामुळे गुहागर तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतकरी, पशुपालक, व्यापारी आणि ग्राहकांना मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमातून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल वाढण्यासही मदत होणार आहे.

या बाजाराबाबत अधिक माहितीसाठी सुचित आंब्रे (८०९७५७२७६७) किंवा चिखली ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chikhali Cattle Market, Chikhali Gram Panchayat, Guhagar News, Konkan Farmers, Livestock Market, Maharashtra News, Ratnagiri APMC, ratnagiri news, Rural Economy, Weekly Market

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *