मालगुंड (रत्नागिरी) : कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक परिसरात आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या विचार आणि साहित्य कार्याचे स्मरण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमामुळे स्मारकात साहित्याचा जागर पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या हस्ते कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर स्मारकातील मधु मंगेश कर्णिक सभागृहात आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन समारंभ पार पडला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर यांच्या हस्ते केशवसुतांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी आबा पाटील आणि नलिनी खेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कवी केशवसुतांच्या युगप्रवर्तक साहित्यिक योगदानावर आणि पुरोगामी विचारांवर प्रकाश टाकला. या सभेला परिसरातील साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.
English Title: Tribute Paid to Poet Keshavsut on His Death Anniversary in Malgund Tags: Malgund, Poet Keshavsut, Marathi Literature, Death Anniversary, Komasap, Literary Event, Konkan Literature

Leave a Reply