शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वर दीपावली’ संगीत मैफलीचे आयोजन

दापोलीत दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वर दीपावली’ संगीत मैफलीचे आयोजन

दापोली : रसिकांसाठी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एका सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीतील विविध क्षेत्रातील मित्रमंडळींनी एकत्र येऊन सुरू केलेल्या कलाकथा इव्हेंट्स या संस्थेतर्फे मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सर विश्वेश्वरैया सभागृहात ‘स्वर दीपावली’ हा संगीतमय कार्यक्रम रंगणार आहे.

सर्व रसिक प्रेक्षकांसाठी या सुरेल मैफलीचा प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. कलाकथा इव्हेंट्सने नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात दापोलीतील पहिल्या लाइव्ह बँड गरबा दांडियाचे यशस्वी आयोजन केले होते, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता दिवाळी पाडव्याच्या दिवशी रसिकांसाठी हा संगीतमय फराळ सादर केला जाणार आहे.

या संगीत मैफलीत लोकप्रिय अभिनेता आणि गायक अमोल बावडेकर तसेच पार्श्वगायिका ईशानी पाटणकर आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. अमोल बावडेकर यांच्या बाजीराव मस्तानी, पांघरूण, भाई व्यक्ती की वल्ली, काकस्पर्श, सुंदर मी होणार, तुला जपणार आहे, प्रतिशोध, स्वामीनी आणि राधा ही बावरी यांसारख्या अनेक कलाकृती गाजल्या आहेत.

तर ईशानी पाटणकर ही सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची शिष्या असून ती सूर नवा ध्यास नवा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धीस आली आहे.

या दिग्गज कलाकारांसोबतच दापोलीतील काही निवडक गुणी स्थानिक गायक, नर्तक आणि बालकलाकारांनाही या रंगमंचावर आपली कला सादर करण्याची विशेष संधी मिळणार आहे.

या सुरेल कार्यक्रमात गाजलेले अभंग, भक्तिगीते, भावगीते, लोकप्रिय चित्रपट गीते आणि अप्रतिम नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत.

कलाकथा इव्हेंट्सतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना या विनामूल्य कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मैफलीच्या मोफत प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी 9930022529 आणि 7249070990 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Amol Bawdekar, cultural event, Dapoli, Diwali Padwa, Ishani Patankar, Kalakatha Events, konkan news, marathi news, Music Concert, Swar Deepawali

Updated: 7 Nov 2026 2:16 PM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *