दापोली : येथील यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन खेळात शानदार यश संपादन केले आहे.
स्पर्धेतील १४ वर्षाखालील मुलींच्या गटात या शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. या विजयी संघात तुबा रिजवान खोत, सुसरा नाजीम काझी, सदफ सदाकत खोत, सिम्या हिदायत शिरगावकर आणि रूशदा खालिद बुरोंडकर यांनी सहभाग घेतला होता.
याशिवाय १७ वर्षाखालील मुलींच्या गटात शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, ज्यामध्ये महेक मुबीन नांदगांवकर, रुनिचा अब्बास खोत, रीदा नदीम अख्तर खोत, आयेशा तजम्मुल चिकटे आणि अलीना असिफ नांदगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटातही शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला, ज्यात लुकमान एजाज अराई, सफीर सज्जाद मोमीन, अरहान सलीम रखांगे, राफे अब्दुल अजीज रखांगे आणि अरसलान सुलेमान निवरेकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन खालिद अब्दुल्ला रखांगे, शाळा समितीचे सदस्य नाझीम उस्मान काझी, संस्थेचे सेक्रेटरी इकबाल परकार, कौन्सील चेअरमन लियाकत रखांगे, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक वसिऊल्लाह दरवाजकर, मुख्याध्यापिका नुजहत मुस्तकीम रखांगे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमरा अलीम रखांगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
दरम्यान, तालुका स्पर्धेत विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघातील खेळाडूंना पुढील टप्प्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

