रत्नागिरी – शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897, दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतुने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे.

दिनांक 07 डिसेंबर, 2020 अन्वये रत्नागिरी जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये आदेश जारीकरुन त्यामध्ये सुधारणा करणेसाठी दिनांक 21 डिसेंबर, 2020 अन्वये पुरवणी आदेश जारी केला होता.

शासनाकडील दिनांक 29 जानेवारी 2021 च्या आदेशाद्वारे शासनाने लॉकडॉऊनची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973 चे कलम 144 अन्वये या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या 07 डिसेंबर 2020 च्या आदेशाची मुदत 07 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 08.59 वाजता संपुष्टात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973 चे कलम 144 (4) मधील तरतुद विचारात घेता जिल्हादंडाधिकारी यांना कलम 144(4) नुसार दोन महिन्यांच्या कालावधीपर्यंतच आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत.

शासनाकडील आदेशांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड- 19, उपाययोजना नियम 2020 ची अंमलबजावणी करणेसाठी ठोस उपाययोजना चालु ठेवणे आवश्यक आहे. सबब कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973 चे कलम 144 अन्वये नव्याने आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक आहे,याकरीता लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी सदर आदेशाच्या दिनांकापासुन ते पुढील आदेश होईपर्यंत (2 महिन्यापेक्षा जास्त नाही इतक्या कालावधीसाठी किंवा सदर आदेश तत्पुर्वी मागे घेईपर्यंतच्या कालावधीसाठी)कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19, उपाययोजना नियम – 2020 ची अंमलबजावणी करणेसाठी ठोस उपाययोजना करणेचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973 चे कलम 144 अन्वये या आदेशाद्वारे 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना रत्नागिरी जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यास प्रतिबंध करणेसह खालीलप्रमाणे आदेश जारी करीत आहे.

लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी