रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे.
रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार अपार्टमेंटचा रहिवासी असलेला भावेश सुरेश चव्हाण हा लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
त्याने या परीक्षेत ७२० पैकी ६६६ गुण मिळवून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे.
भावेशने ९९.९६६८९८३ पर्सेंटाईल मिळवून हे यश संपादन केले आहे.
लातूरमध्ये राहून घेतलेल्या कष्टाच्या जोरावर मिळवलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयाच्या आणि रत्नागिरीकरांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.

