रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कोकणचे नेते आणि माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन आणि माजी आमदार विनय नातू यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी आणि माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.

या छोटेखानी स्वागत समारंभाला पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.